रोहित धूपदाळे/चंदगड प्रतिनिधी : मुंबई मंत्रालयाय येथे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयात त्यांचे सचिव श्री.ओमनकर यांची भेट घेऊन चंदगड तालुक्यातील एसटी बस स्थानकाचे नुतनीकरण करावे व चंदगडला जादा बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात.याकरिता बाळासाहेबांची शिवसेना चंदगड यांची निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.अपूऱ्या बसेस मुळे तालुक्यातील शाळा-कॉलेजच्या मुला-मुलींना वेळेवर शाळेला पोहचाता येत नाही व परत शाळेतुन घरी पोहचायला पणं वेळेत बसेस नसल्याने मुलांचे प्रचंड हाल होत आहेत.तसेच चंदगडला तालूक्याच्या ठिकाणी शासकीय कामासाठी येणाऱ्या महिला, अबालवृद्ध महिला,व पुरुष यांनाही वेळेत बसं नसल्याने तासानतास बसथांब्यावर थांबावे लागते आहे.
एकंदरीत लोकांची होणारी गैरसोय थांबवण्यासाठी जादा बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात.व तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यात व उन्हाळ्यात बसच्या प्रतिक्षेत थांबणाऱ्या प्रवाशांना बस स्टॉप नाहीत त्या ठिकाणी बस स्टॉप बांधून सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.तसेच लवकरात लवकर चंदगड बस स्थानकाचे नुतनीकरण करावे अशा सर्व गोष्टी निदर्शनास आणून देऊन चर्चा केली.व त्यासंदर्भात निवेदन निवेदन देण्यात आले.
यावेळो निवेदन देण्यासाठी शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख राजाराम मांगले,चंदगड तालुका शिवसेना तालुका प्रमुख कल्लापान्ना निवगीरे,गडहिंग्लज तालुका प्रमुख संजय सकपाळ,चंदगड तालुका शिवसेना महिला तालुका प्रमुख इंद्रायणी बोकमूरकर,उपतालुका प्रमुख वंदना सुभेदार,वाहतूक सेना तालुका प्रमुख सलीम मुल्ला, मनोहर पाटील, मोहन बोकमूरकर, श्रीकांत सुभेदार व शिवसैनिक उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments