Type Here to Get Search Results !

कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी बार असोसिएशनची रॅली.

कोल्हापूर प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरात स्थापन व्हावे या मागणीसाठी कोल्हापूर बार असोसिएशनकडून रॅली काढण्यात आली.या रॅलीला काँग्रेस नेते बंटी पाटील यांनी सहभाग नोंदवत पाठींबा दिला.

खंडपीठाच्या मागणीला काँग्रेस पक्षाचा ठाम पाठिंबा असून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार अशी ग्वाही यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिली. यावेळी माजी महापौर आर. के पोवार, बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. संग्राम देसाई, अ‍ॅड. सर्जेराव खोत, अ‍ॅड. शिवाजीराव राणे, अ‍ॅड इंद्रजित चव्हाण, बाबा पार्टे यांच्यासह अनेक अधिवक्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments