Type Here to Get Search Results !

प्रा.डॉ. ए. के. कांबळे यांना इंटरनॅशनल महात्मा ज्योतीराव फुले सोशल आयकॉन डायमंड ॲचीव्हर्स ॲवार्ड.

चंदगड प्रतिनिधी : कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कोवाड येथील हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. अजयकुमार कृष्णा कांबळे यांना गोपाल किरण समाज सेवी संस्था, भोपाळ, मध्यप्रदेश यांचे मार्फत विवेकानंद सभागृह, डिंपे कॉलेज, मीरामार, पणजी गोवा मार्फत आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्र व ॲवार्ड वितरण अशा संयुक्त कार्यक्रमामध्ये प्राचार्य डॉ. पी. एस. राममूर्ती,प्रकाशसिंह निमराजे तसेच पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे स्नेहल कोलतेकर यांच्याहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी बिहारचे प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुधांशु कुमार चक्रवर्ती, राष्ट्रपती पुरस्कार प्रा. डॉ सरोज मीना, डॉ.वैशाली नायक,आय.पी.एस.अधिकारी डॉ. बी.पी. अशोक (लखनऊ),प्रमुख वक्ते सुर्यकांत वर्मा,गोवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचे संचालक भगोरथ शेटे उपस्थित होते.

यापूर्वीही प्रा. डॉ. ए. के. कांबळे यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हिंदी विभागामध्ये गेली 25 वर्षे विभागप्रमुख व प्रोफेसर पदावर कार्यरत आहेत.त्यांनी आतापर्यंत 46 आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय शोध पत्रिकेमध्ये शोधनिबंध प्रकाशित केले आहेत तसेच विविध चर्चासत्रामध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या 4 पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच विविध विषयावर त्यांनी व्याख्याने दिली आहेत तसेच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी समाज विकास, साक्षरता, पर्यावरण इ. विषयांवर व्याख्याने दिली आहेत. सदर पुरस्कार मिळालेबद्दल सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे, सचिव मा. एम. व्ही. पाटील, संस्था पदाधिकारी , प्राचार्य. डॉ. एम. एस. पवार, संचालक मंडळ यांनी त्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयातील शिक्षक व प्रशासकीय वर्ग यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.





Post a Comment

0 Comments