Type Here to Get Search Results !

सुंडीच्या अनुष्का पाटील मिस बेळगाव विजेत्या ठरल्या!

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : सूंडी ता.चंदगड येथील अनुष्का राजीव पाटील सद्या रा. हिंडलगा हिने जीवन संघर्ष फाउंडेशन व नील क्रिएशन तर्फे घेतलेल्या फॅशन वीकमध्ये पहिल्या फेरीत कनिष्ठ गटात मिस बेळगाव हा किताब प्राप्त केला.चित्रपट निर्माते डॉ गणपत पाटील,श्री ऑर्थोचे अध्यक्ष डॉ देवेगौडा आय.,भाजप नेते विनय कदम, डॉ ज्ञानेश मोरकर व मान्यवर यांच्याहस्ते किताब प्रदान करण्यात आला.यासाठी तिला वडील राजीव पाटील,आई सौ प्रिया पाटील,भाऊ रोहित यांचे मार्गदर्शन लाभले.





Post a Comment

0 Comments