नेसरी प्रतिनिधी/संजय धनके : गडहिंग्लज तालुक्यातील महागाव गावचे सुपुत्र राजेंद्र जोतिबा पताडे यांचे बालपण शेतकरी कामगार पक्षाचे नेते कै.भाई धोंडीराम पताडे (काका) यांचे मार्गदर्शनाखाली झाले. त्यांनी बारावी पर्यंत शिक्षण महागाव येथे घेतल्यानंतर नोकरीसाठी मुंबई येथे गेले.व सन 1988 साली त्यांची ठाणे येथे पोलीस दलात निवड झाली.त्यांनी मुंबई पोलीस दलात पाच वर्ष उत्कृष्ट सेवा बजावल्यानंतर सन 1993 साली कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाली.सध्या ते नेसरी ठाण्यात कार्यरत आहेत. आतापर्यन्त त्यांनी गांधीनगर ,गडहिंग्लज, गगनबावडा, लक्ष्मीपुरी, आजरा व नेसरी येथे सेवा बजावली.
नेसरी येथे सहाय्यक फौजदार पदी सेवा बजावत असताना दोन महिन्यापूर्वी कोवाड येथील एसबीआय बँकेच्या एटीएम चोरीतील आरोपीना पकडण्यासाठी नेसरी पोलीस ठाण्याचे सपोनी आबा लाला गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हवालदार राजकुमार माने यांच्या समावेत मोलाची कामगिरी बजावली होती.त्यांनी पोलीस खात्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठांनी त्यांची दखल घेत उपनिरीक्षक पदी निवड करण्यात आली आहे.
Post a Comment
0 Comments