चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : माणगाव तालुका चंदगड येथील सुपुत्र व जवान सदाशिव बाळू नीट्टूरकर हे भारतीय सैन्यदलातून 22 वर्षे उल्लेखनीय अशी सेवा बजावून नायक पदावरून सेवानिवृत्त झालेने त्यांचा ग्रामस्थ, आजी माजी सैनिक संघटना वतीने सपत्नीक सत्कार झाला.अध्यक्ष स्थानी उद्योजक शामराव बेनके होते.
यावेळी सेवानिवृत्त जवान जवान सदाशिव बाळू नीट्टूरकर यांची गावभर मिरवणूक काढण्यात आली.त्यांची भरती जबलपूर येथे सिग्नल रेजिमेंटला सोलजर जी डी पदी झाली होती. लान्स नायक,नायक आदी पदावर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.त्यांच्या या जीवनप्रवासात पत्नी सौ. अल्का,मुली सानिका,समीक्षा यांचे योगदान लाभले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.वांद्रे यांनी करत सर्वांचे आभार मानले.
Post a Comment
0 Comments