चंदगड प्रतिनिधी : देवरवाडी येथील श्री क्षेत्र वैजनाथ देवालय हे प्राचीन, पुरातन काळातील मंदिर असून यादव काळात हेमाडपंथीय कलाकुसरीत साकारलेले देवस्थान आहे. बेळगाव सीमाभागातील तसेच महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवालयात लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात.
पंचांगानुसार 26 फेब्रुवारी 25 रोजी महाशिवरात्री असून 25 फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजल्यापासून सकाळी ६ पर्यंत भाविक भक्तांचे अभिषेक केले जातात. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री भर यात्रा असून या रात्री महारुद्र अभिषेक, यामपूजा केली जाते. तर 27 फेब्रुवारी रोजी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाते व त्यानंतर महाशिवरात्री उत्सवाची सांगता होते.ज्या भाविक भक्तांना अभिषेकसाठी नाव नोंदणी करावयाची आहे त्यांनी 25 फेब्रुवारी पर्यंत आपली नावे श्री.वैजनाथ देवालय स्थानिक सल्लागार उपसमितीकडे नोंदवावीत.तसेच लाखो भाविकांनी दर्शनासाठी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा.यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक बांधकाम विभाग व प.महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु असून भाविक भक्तांनी देणगी व मदत करून जीर्णोद्धाराच्या कार्याला हातभार लावावा असे आवाहन वैजनाथ देवालय स्थानिक सल्लागार उपसमितीने केले आहे.
Post a Comment
0 Comments