चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : चंदगड तालुक्यातील दिर्घायुषी ज्येष्ठांचा सन्मान त्यांच्या घरी जावून करणेचा उपक्रम चंदगड तालूका ज्येष्ठ नागरिक जिव्हाळा सेवा समिती हाती घेतला आहे.महाराष्ट् ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे,महासचिव चंद्रकांत महामुनी,अरुण रोडे ,नाना इंगळे यांच्या संकल्पनेतून हा ९o + ज्येष्ठाची उमेद वाढविणारा कार्यक्रम प्रचंड उत्साहात पार पडतोय.
चंदगड तालूक्यातील झेंडेवाडी येथील वृद्ध मातोश्री वय ९६ यांचा सन्मान जिव्हाळा सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे घरी जावून केला.सरपंच मोहन झेंडे,संपर्कप्रमुख सोमनाथ गवस,जिव्हाळ्याचे अध्यक्ष बंडोपंत पाटील,वयोवृद्ध माजी अध्यक्ष सोनार गुरुजी,ज्येष्ठमित्र महिला अहिल्याबाई पुरस्कार विजेत्या लतिका सुरुतकर यांच्यासह सदानंद झेंडे,रमेश झेंडे,बंडू झेंडे व त्याचे सर्व कुंटुबिय मोठ्या संख्येने आणी उत्साहाने सहभागी होते.
Post a Comment
0 Comments