नेसरी प्रतीनीधी/पुंडलिक सुतार : वाघराळी ता. गडहिंग्लज येथील कन्या जयश्नी धर्मराज पाटील हिची मुंबई पोलीस पदी निवड झालेने गावांसह तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.जयश्री पाटील हिचे शिक्षण डॉ.घाळी कॉलेज गडहिंग्लजला बी. कॉम पर्यंत झाले.असुन मरीन लाइन मुंबई येथे तिची ऑगस्ट २०२४ ला मैदानी चाचणी झाली होती.तर लेखी परीक्षा ११जानेवारी २०२५ ला नानपाडा मुंबई येथे झाली.
सदर परीक्षेत तिने १५० पैकी १३० गुण प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त केले.तर निकाल फेब्रुवारी २०२५ ला लागला.यासाठी तिचे वडील - धर्मराज, आई सौ. साधना, भाऊ - सुरज, बहीण - मयुरी पाटील या सर्वाचें प्रोत्साहन लाभले.
Post a Comment
0 Comments