Type Here to Get Search Results !

माजी आमदार लहू मामलेदार यांचा बेळगांवात खून.

रुपेश मऱ्यापगोळ/ चंदगड प्रतिनिधी : आपल्या कामानिमित्त गोव्याहून बेळगावला आलेले माजी आमदार लहू मामलेदार वय वर्षे 68 यांचा रिक्षा चालकाशी किरकोळ वादातुन खून करण्यात आला.याबाबत सविस्तर माहिती अशी लहू मामलेदार हे बेळगाव येथे आपल्या कामानिमित्त आले असता खडे बाजार येथील श्रीनिवास लॉज येथे थांबले होते.दुपारी कामानिमित्त लॉज मधून बाहेर पडत असताना रिक्षाला त्यांच्या गाडी घासल्याचे किरकोळ कारणावरून रिक्षा चालक मुजाहिद शकील जमादार( वय वर्ष 28,राहणार सुभाष नगर बेळगाव ) याने मामलेदार यांच्या कपाळावर जोरदार प्रहार केला. मारहाणीच्या घटनेनंतर सावरत मामलेदार लॉजच्या काउंटरपर्यंत आले आणि तिथेच कोसळले.लगेचच त्यांना जिल्हा रुग्णालय बेळगाव येथे उपचाराकरता नेण्यात आले. परंतु उपचाराचा काही उपयोग न होता त्यांचा मृत्यू झाला. घडण्याची माहिती खडे बाजार पोलिसांना समजताच वेगाने तपास करत रिक्षा चालकाला अटक केली. 

पोलीस उपआयुक्त रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तसेच पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद जिल्हा रुग्णालयात भेट देऊन घडलेल्या घटनेचा तपशील वरिष्ठांना कळविला आहे. मयत लवू मामलेदार हे फोंडा विधानसभेचे  2012 ते 2017 या कालावधीत आमदार होते.





Post a Comment

0 Comments