चंदगड प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत ‘वाढते सायबर गुन्हे व खबरदारी’ या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा महादेवराव बी. एड.कॉलेजमध्ये पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संस्थाध्यक्ष महादेवराव वांद्रे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. राम मधाळे(आजरा महाविद्यालय) व अरुण डोंबे (पी.एस.आय.चंदगड)हे होते.
कार्यशाळेचे उद्गघाटन प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते झाले. “डिजिटल क्रांतीमुळे देशामध्ये स्मार्टफोन, सामाजिक संवाद माध्यमांचा वापर, ऑनलाईन आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यातूनच आपली व्यक्तिगत माहिती सायबर गुन्हेगार मिळवतात व फसवणूक करतात. ऑनलाईन गेमिंग, बोगस विडीओ कॉल, एस. एम. एस., डीजीटल अरेस्ट, सिमकार्ड क्लोन करणे, बोगस वेब साइटस, बोगस अँप्स,आवाज व चेहरा क्लोन, बँक खाते हॅक करणे, आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात सायबर फसवणूक केली जाते. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर चाणाक्षपणे केला जातो. भविष्यामध्ये सायबर युद्ध जगामध्ये वाढतील. त्यामुळे सायबर दक्षतेबाबत शिक्षक, विद्यार्थी, पालक, व समाजातील प्रत्येकाला याबाबत जागृत केले पाहिजे”, असे प्रतिपादन डॉ. राम मधाळे यांनी विविध सायबर गुन्ह्यांचे दाखले देत केले.
“फेसबूक, व्हाट्सअसप, ट्वीटर यासारखी अनेक अँप्स वापरताना दक्षता घ्यावी.अल्पवयीन मुले, तरुण युवक सायबर गुन्ह्याचे बळी पडतात. आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे ते परत मिळण्याची शक्यता कमी असते.सायबर फसवणूक होताच सायबर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देऊन सहकार्य करा. व्यक्तिगत माहिती अनोळखींना न देणे, बोगस कॉल न घेणे, ओटीपी न सांगणे, ऑनलाईन काम करताना दक्षता घेणे, मजबूत पिन ठेवणे यासारखी खबरदारी घ्यावी “ असे प्रतिपादन पी. एस. आय.अरुण डोंबे यांनी केले.
या कार्यशाळेसाठी संचालिका मृणालिनी वांद्रे, प्रा. बी एस. चौगुले, श्रीम. स्वप्ना देशपांडे, प्रा.एस. पी. गावडे, प्रा.सुधीर लंगरे, प्रा.अमेय वांद्रे, प्रा. वाय. पी. पाटील, प्रा. मुल्ला एम. आर. , बी एड. चे. सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.कार्यशाळेचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्रभारी प्राचार्य कांबळे एन. जे. यांनी केले तर आभार कार्यशाळा समन्वयक प्रा. प्रधान जी. जी. यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी प्रियांका हरकारे व किरण नाईक यांनी केले.
Post a Comment
0 Comments