Type Here to Get Search Results !

संपादक ज्ञानेश्वर पाटील यांनी ज्येष्ठ विधी तज्ञ डॉ.अमर मुल्ला यांची घेतली भेट.

पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्र माझा 24 चे संपादक ज्ञानेश्वर पाटील यांनी ज्येष्ठ विधी तज्ञ डॉ.अमर शहाबुद्दीन मुल्ला यांची पुणे येथील निवासस्थानी भेट घेत विविध विषयावर चर्चा केली.यावेळी ज्येष्ठ विधी तज्ञ डॉ.अमर मुल्ला यांनी विविध सामाजिक व महिला, बालकल्याण विभागासाठी काय महत्वाचे बदल झाले पाहिजे? राम मंदिराचा प्रश्न, तिहेरी तलाक, कलम 370 या विषयावर त्यांनी केलेले कार्य यावर मत मांडले.एकंदरीत विधी क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान पाहून त्यांना संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्याहस्ते गौरव करण्यात आले होते.तसेच सध्या त्यांची महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या समितीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.त्यामुळे ज्ञानेश्वर पाटील यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

'आदर्श विधी तज्ञ'-डॉ.अमर शहाबुद्दीन मुल्ला

डॉ.अमर मुल्ला यांनी पूर्वापार चालत आलेली ब्रिटिश क्रिमिनल लॉ, इंडियन पिनल कोड 1860, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1898, दि इंडियन्स इव्हिडन्स ॲक्ट 1872, भारतीय साक्ष अधिनियम  2023, भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 इत्यादी पुस्तकांचे त्यांनी लिखाण केले आहे.












Post a Comment

0 Comments