Type Here to Get Search Results !

मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्याहस्ते ज्येष्ठ विधी तज्ञ डॉ.अमर मुल्ला यांचा गौरव.

रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : विधी क्षेत्रात असामान्य कार्य करणारे एक विधी तज्ञ म्हणून ज्यांचा आदराने महाराष्ट्रसह भारतात उल्लेख केला जातो ते नाव म्हणजे डॉ.अमर शहाबुद्दीन मुल्ला. 

डॉ.अमर मुल्ला हे ज्येष्ठ विधी तज्ञ आहेत.त्यांनी अनेक कायदेविषयक पुस्तकांचे लेखन केले असून राम मंदिराचा प्रश्न, तिहेरी तलाक, कलम 370 असे अनेक जटिल प्रश्नांचा अभ्यास करून ते सहजरीत्या सोडविला आहे.त्यामुळे त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान प्रेरणादायी असून लोकांसाठी ते 'आदर्श विधी तज्ञ' ठरत आहेत.

डॉ.अमर मुल्ला यांनी पूर्वापार चालत आलेली ब्रिटिश क्रिमिनल लॉ, इंडियन पिनल कोड 1860, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1898, दि इंडियन्स इव्हिडन्स ॲक्ट 1872, भारतीय साक्ष अधिनियम  2023, भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 इत्यादी पुस्तकांचे त्यांनी लिखाण केले असून त्यांच्या या कार्याबद्दल नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात संविधान दिनाच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्याहस्ते गौरव करण्यात आला आहे.यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ विधी तज्ञ कपिल सिब्बल,आर.व्यंकटरमणी,तुषार मेहता यांच्यासह दिग्गज मंडळीनी उपस्थिती लावली होती.





Post a Comment

0 Comments