Type Here to Get Search Results !

गौराबाई गावडे यांचा जीबीएस सिंड्रोम आजाराने सीपीआर रुग्णालयात मृत्यू.

चंदगड प्रतिनिधी /रुपेश मऱ्यापगोळ : सोनारवाडी तालुका चंदगड येथील गौराबाई गावडे वय 60 यांचा जीबीएस सिंड्रोम आजाराने सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला.गौराबाई गावडे या सौंदती येथे यात्रेसाठी गेल्या होत्या.यावेळी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांनी गावात उपचार घेतले.उपचाराला प्रकृती साथ देत नसल्याने त्यांना सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

या घटनेने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दरम्यान सी.पी.आर  मध्ये अजून जी बी एस ची लागण झालेले आठ रुग्ण असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांनी दिली.या घटनेची दखल आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली असून कोल्हापूर प्रशासन आता सतर्क झाले आहे.





Post a Comment

0 Comments