चंदगड प्रतिनिधी : इंटर इंजिनिअरींग डिप्लोमा स्टुडंन्ट स्पोर्टस् अशोसिएशन, महाराष्ट्र स्टेट अंतर्गत कोल्हापुर विभाग झोनल टूर्नामेंटचे “शरद इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (पॉलिटेक्निक)यड्राव येथे खो-खो स्पर्धेचे आयोजन केलेले होते. सदर स्पर्धेमध्ये तुर्केवाडी मधील पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यातील विविध पॉलिटेक्निक इंजिनिअरींग मधील एकूण १४ संघानी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेतील यशाबद्दल कॉलेजमध्ये गुण गौरव आयोजित करण्यात आला. संस्थापक महादेवराव वांद्रे यांनी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.“सातत्य आणि खेळाचा सराव या मधूनच उत्कृष्ट खेळाडू तयार होतात. तुम्हा सर्वांनी मिळविलेले यश गौरवास्पद आहे ” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. प्राचार्य एस. पी. गावडे यांनीही सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.या सत्कार कार्यक्रमासाठी प्रशिक्षक प्रा. सचिन कांबळे व प्रा. राज मनिकीरे यांचेबरोबरच बी. एस. चौगुले (कार्यकारी संचालक), प्र. प्रा. एन. जे. कांबळे, श्रीम. देशपांडे एस. आर., प्रा. प्रधान जी. जी,प्रा. सूर्यकांत कांबळे, प्रा. स्वप्निल सुतार, प्रा. प्रियंका कदम, प्रा. संकेत खोत आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments