कविता मऱ्यापगोळ / गडहिंग्लज प्रतिनिधी : महाराष्ट्र,कर्नाटक, सीमा भागासह सिंधुदुर्ग व गोवा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळभैरव देवाची यात्रा 14 फेब्रुवारी रोजी होत असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर दिनांक 13 रोजी निघणाऱ्या पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेल्या गोंडे बांधण्याचे काम आत्तार कुटुंबीय करत आहेत. या पालखीला बांधणाऱ्या अकरा फुटाचे तीन गोंडे, कोकण मिल्क चे स्वप्निल चौगुले, पालखीचे मानकरी उपराटे परिवार यांचा १० फुटी गोंडा मुख्य आकर्षण असणार आहे. यात्रेच्या आदल्या दिवशी सायंकाळी घटना शहरातील श्री काळभैरव मंदिरातून मिरवणुकीने पालखी मानकरी व पोलीस बंदोबस्तात डोंगरावरील मंदिराकडे रवाना होते.
या पालखी सोहळ्याला व मानाचा शासन काट्यांना गोंडे बांधण्याची पूर्वापर परंपरा आहे. हे गोंडे करण्याचे काम गडहिंग्लज मधील अत्तार कुटुंबे दरवर्षी करत असतात उद्याच पालखी सोहळा असल्याने यावर अंतिम हात फिरवत असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर गणेश शहरासह तालुक्यात सर्वत्र लगबग चाललेले असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देखील तयारी सुरू आहे. गडहिंग्लज शहरापासून डोंगरावर जाण्यासाठी एसटी महामंडळ यांनी यात्रेसाठी खास बसेसची सोय केलेली आहे.
Post a Comment
0 Comments