आजरा (प्रतिनिधी) : त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्था उत्तूर - आजरा कोल्हापूर यांच्यावतीने उपक्रमशील शिक्षक रवींद्र पाटील यांना विशेष नाविण्यपूर्ण नवोपक्रम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुळचे कुद्रेमानी (ता. बेळगाव) येथील असलेले आणि सध्या राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बु. येथे कार्यरत असलेले रवींद्र पाटील हे शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम करीत आहेत.चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कर्नाटक राज्याध्यक्ष तसेच सीमाकवी म्हणून ओळखले जाणारे रवींद्र पाटील यांनी साहित्य व शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवली आहे.
नवोपक्रम हे शिक्षकांना अधिक सक्षम बनवणारे प्रभावी साधन आहे.जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत सहभागी होत . 'बातमी लेखन ' हा अभिनव उपक्रम प्रा. श्रीकांत नाईक यांच्या तेरा निवडक नवोपक्रम या पुस्तकात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पत्रकारितेची आवड निर्माण करण्याचे महत्वपूर्ण कार्य रवींद्र पाटील करत आहेत.
दि.9 फेब्रुवरी 2025 रोजी झालेल्या विशेष कार्यक्रमात गोकूळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर व प्राचार्य जे. पी. माळी यांच्याहस्ते रवींद्र पाटील यांना विशेष नाविण्यपूर्ण नवोपक्रम सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.या सन्मानामुळे शिक्षण व साहित्य क्षेत्रात नवोपक्रमशील कार्य करणाऱ्या शिक्षकांना मोठी प्रेरणा मिळाली आहे.रवींद्र पाटील यांनी शिक्षण व साहित्य क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवत मराठीचा जागर केला आहे. बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन हे त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान ठरले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याची दखल घेत त्यांना मिळालेला हा सन्मान संपूर्ण शिक्षण व साहित्य विश्वासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
Post a Comment
0 Comments