Type Here to Get Search Results !

लकिकट्टे गावची कन्या सोनालीची मुंबई पोलीस पदी निवड.

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : लकिकट्टे तालुका चंदगड येथील कन्या कु.सोनाली दिनकर सुतार हीची मुंबई शहर पोलिस पदी निवड झालेने गावासह तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिक माहिती अशी की,सोनालीला पोलीस व्हायची जिद्द होती.पोलीस होण्याचे ध्येय मनाशी बाळगून तिने अपार कष्ट घेतले.अखेर तिच्या परिश्रमाचे सार्थक झाले.ऑगस्ट 2024 मध्ये मरीन लाईन मुंबई येथे तिची मैदानी चाचणी झाली.तर लेखी परीक्षा जानेवारी 2025 मध्ये झाली.तर निकाल 8 फेब्रुवारी 2025 ला लागला.सदर परीक्षेत तिने घवघवीत यश प्राप्त केले.तिची घरची परिस्थिती बेताची असून सुद्धा तिने पोलीस पदाला गवसणी घातली.तिला यासाठी आई सौ.लता,वडील दिनकर,भाऊ नागेश,चुलते विवेकानंद व आप्पाजी सुतार,आत्ती सौ.सुनंदा यांचेसह सर्व सुतार परिवार यांचे प्रोत्साहन लाभल्याचे तिने यावेळी सांगितले.यावेळी महाराष्ट्र माझाचे पत्रकार पुंडलिक सुतार यांनी तिचा सत्कार केला.


                         सोनाली दिनकर सुतार






Post a Comment

0 Comments