चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : होसूर तालुका चंदगड येथील घाटामध्ये चार चाकी वाहनाचा अपघात घडला असून अपघात स्थळी वाहनाचा चक्काचूर झालेला आहे. या अपघाताने गाडीच्या सर्व एअर बॅग खुले झाले आहेत.घटनास्थळावरील परिस्थितीनुसार असे समजते की चार चाकी वाहन बेळगावहून कोवाड जात असताना वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून रस्त्या पलीकडील झाडांना जोरदार टक्कर दिल्याने गाडीचे सुमारा 80 टक्के नुकसान झाले असून सदर अपघात हा रात्री उशिरा झाल्याचे कळते.
या अपघातामध्ये गाडीचे नंबर प्लेट अर्धवट दिसत असल्याने ही गाडी महाराष्ट्र पासिंगचे असल्याचे समजते. सदर घटनेसंदर्भात पोलीस दूरक्षेत्र कोवाड येथे आमच्या प्रतिनिधीने संपर्क केले असता कोणतीही नोंद अद्याप झाली नसल्याने जखमी बाबत सुद्धा नेमकी माहिती मिळत नाही.
Post a Comment
0 Comments