Type Here to Get Search Results !

श्री.क्षेत्र वैजनाथ येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.

चंदगड प्रतिनिधी : देवरवाडी येथील श्री.वैजनाथ देवालयात 25 ते 27 फेब्रुवारी याकाळात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.हर हर महादेवच्या जयघोषात संपूर्ण परिसर दणाणून गेला.मंदिरातील शिवलिंगावर मुख्य अभिषेक आणि देवी पार्वतीच्या मूर्तीचे विधीवत पूजन करून महाशिवरात्रीला सुरवात झाली. 25 फेब्रुवारी ला रात्री स्थानिक सल्लागार उपसमितीने विधीवत अभिषेक घालून इतर भक्तांनाही अभिषेकची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

बुधवारी दि 26 रोजी पहाटे 6 वाजल्या पासून देवालय भाविकांना देवदर्शनासाठी खुले करण्यात आले.हजारो भाविकांनी देवदर्शनाचा लाभ घेतला.चंदगड तालुक्याचे आमदार शिवाजीराव पाटील तसेच ईतर नेतेमंडळी यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह  श्री.वैजनाथ देवालयाला भेट देवून दर्शन घेतले.यावेळी वैजनाथ देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीच्या वतीने प्रा. नागेंद्र जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांचे स्वागत व सत्कार केला.आमदार पाटील यांनी वैजनाथ देवालयाच्या विकासासाठी व पर्यटन दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच शिवरात्री महाप्रसादासाठी 11 हजार 500 रु ची देणगी देवून सहकार्य केले.यावेळी मंदिराची पाहणी करण्यासाठी देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर येथून अनिरुद्ध गुरव,निखिल गुरव हे कर्मचारीही उपस्थित होते.

पंचक्रोशीतील, सीमाभागातील तसेंच चंदगड तालुक्यातील असंख्य भाविकांनी मंदिरात हजेरी लावली.गुरुवारी दुपारी 12.30 नंतर महाप्रसादाला सुरुवात झाली. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिराची आकर्षक रोषणाई, देवदर्शनाची सुलभ सोय, पाणीव्यवस्था,पार्किंग व्यवस्था, महाप्रसादाची उत्तम व नीटनेटकी व्यवस्था, तसेंच उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी चंदगड पोलीस ठाणे यांच्याकडून  बंदोबस्त व्यवस्थाउत्तम पार पाडण्यात आली.देवस्थान समितीच्या वतीने त्यांचेही आभार मानण्यात आले.एकंदरीत शिवरात्री महोत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी स्थानिक सल्लागार उपसमितीतील अमोल भोगण, सचिव शंकर भोगण,शिवाजी भरमू भोगण, पोलीस पाटील जयवंत कांबळे, प्रमोद केसरकर,शिवकुमार पुजारी,रामू कांबळे, परशराम आडावआदींनी तसेच वैजू लक्ष्मण भोगण, लक्ष्मण परसू भोगण, शंकर आडाव,केदारी आंदोचे, संघर्ष प्रज्ञावंत, प्रा नागेंद्र जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले व उत्सवाची यशस्वी सांगता केली.





Post a Comment

0 Comments