नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन व मराठी राजभाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी 25 रोजी एस.एस हायस्कूल नेसरी येथे संपन्न झाला.प्रथमतः कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्रशालेचे प्राचार्य एस जे कालकुंद्रीकर,उप मुख्याध्यापक एस. एच. पाटील,पर्यवेक्षक पी. व्ही. सूर्यवंशी,उपप्राचार्य आय.टी.नाईक,मराठी विभाग प्रमुख वाय.व्ही.तरवाळ व शालेय मंत्रिमंडळ सदस्य यांच्या शुभहस्ते झाले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी विभागामार्फत सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध विषयावर माहिती मांडली. त्यामध्ये अनुष्काने 'मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जा', दुर्वा पन्हाळकर हिने 'मराठी भाषा संवर्धन काळाची गरज',कार्तिकी कदम हिने मराठी राजभाषा गौरव दिन,दुर्वा बामणे हिने कवी कुसुमाग्रज यांच्या कवितेचे वाचन तर रोशनीने कानाचे आत्मवृत्त सादर केले.
सदर कार्यक्रमात मराठी भाषेबद्दलचे अभिमान गीत एस.एस.हायस्कूलच्या गीत मंचकडून सादर करण्यात आले.तसेच शिक्षक मनोगतामध्ये संध्या नाईक यांनी मराठी राजभाषा याविषयी माहिती दिली.प्रशालेचे प्राचार्य.एस.जे.कालकुंद्रीकर यांनी कवी कुसुमाग्रज यांच्याबद्दलची माहिती देत आपल्या मनोगतातून मराठी साहित्यिक व त्यांच्या साहित्याबद्दलची माहिती दिली.यावेळी मराठी विभाग प्रमुख वाय.व्ही.तरवाळ,कलाशिक्षक सुनिल सुतार,एस.एस देसाई,आर.एम.बागवान व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments