चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : चंदगड तालुक्यातील आडुरे या गावच्या तरुणाची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे.अनिकेत याचे प्राथमिक शिक्षण दि.न्यू.इंग्लिश स्कूल चंदगड येथे झाले.लहानपणापासूनच मैदानातील विविध स्पर्धेमध्ये भाग घेण्याच्या आवडीमुळे शंभरहून अधिक बक्षिसे त्याने जिंकली आहेत.त्याच्या या क्रीडा क्षेत्रातील कामगिरी व मेहनतीमुळे कोइंबतूर येथील 110 मद्रास रेजिमेंट मध्ये खेळाडू सैनिक म्हणून निवड झाली.
अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत मेहनत करून त्याने हे यश प्राप्त केले आहे.गेली 5 ते 6 वर्षे तो रायझर्स ट्रॅक फाउंडेशन महाराष्ट्र चंदगड येथे राष्ट्रीय प्रशिक्षक लक्ष्मण कीर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होता.त्याच्या यशामागे आई,वडील,भाऊ अमर यांचे प्रोत्साहन लाभले.अनिकेतची आनंदी वार्ता समजताच आडुरे या गावातील ग्रामस्थ व युवकांनी त्याची सुंदररीत्या गावातून मिरवणूक काढली.व परिवाराकडून औक्षण करण्यात आले.या निवडीनंतर त्याला सर्व माध्यमातून कौतुक करत शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Post a Comment
0 Comments