रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : हरळी बुद्रुक तालुका गडहिंग्लज येथील सहकार महर्षी आप्पासाहेब नलवडे सहकार कारखान्यासमोर असलेला माळरानावर उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याहस्ते करण्यात आले.
या प्रकल्पामुळे महागाव विभागातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमाला प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, महावितरणचे विजय आडके,तहसीलदार ऋषिकेत शेळके, चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण,महागाव महावितरण उपकेंद्राचे संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना शेतपंपासाठी दिवसा वीज उपलब्ध होणार असून शेतकरी बंधूंना सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वीज मिळणार असून रात्री शेतात जाण्याची आवश्यकता भासणार नाही असे जिल्हाधिकारी यांनी बोलताना सांगितले . यावेळी मंडळ अधिकारी राजेंद्र तोळे, सरपंच नीलम कांबळे, उपसरपंच बाजीराव गोरुले,यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील ग्रामविकास अधिकारी व या प्रकल्पाचे ठेकेदार मेघा इंजीनियरिंगचे अधिकारी, महावितरणचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments