Type Here to Get Search Results !

गुरुवारी होणार श्री.महालक्ष्मी देवी मंदिराच्या नूतन सभामंडपाची पायाभरणी.

रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : गडहिंग्लज शहरातील श्री.महालक्ष्मी मंदिराच्या नूतन सभामंडपाची पायाभरणी 20 मार्च रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. गुरुवार दिनांक 20 मार्च रोजी सकाळी सात वाजता शहरातील हिरण्यकेशी नदी घाट पासून महालक्ष्मी मंदिरा पर्यंत सुहासिनींची कलश मिरवणूक निघणार असून सकाळी दहा वाजता महालक्ष्मीस जलाभिषेक व पायाभरणी समारंभ कार्यक्रम पार पडणार आहे.

हा कार्यक्रम निडसोशी येथील दुर दुंडेश्वर  मठाचे शिवलिंगेश्वर महास्वामीजी, नूल येथील सुरगीश्वर  मठाचे गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, कसबा नूल येथील रामनाथ गिरी समाधी मठाचे मठाधिपती भगवान गिरी महाराज, शहरातील बेलबाग येथील जडिया सिद्धेश्वर आश्रमांचे महंत सिद्धेश्वर महास्वामीजी, हत्तरगी येथील हरी मंदिराचे पिठाधीश गोसावी महाराज, भडगाव येथील समर्थ नगरचे  किसन महाराज यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.           

या कार्यक्रमानंतर महालक्ष्मी देवीची ओटी भरणे व महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडणार असून ज्या भगिनींना देवीस दुरडी- गारवा आणावयाचे आहे त्यांनी श्री महालक्ष्मी मंदिर येथे आणावे व कार्यक्रमाचे शोभा वाढवावी असे आवाहन श्रीदेवी महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व संचालक मंडळांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments