Type Here to Get Search Results !

मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षपदी विशाल परदेशी यांची निवड !

मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षपदी न्यूज 18 लोकमतचे प्रसिध्द अँकर विशाल परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच मुंबई विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी काल नांदेड येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली.

विशाल परदेशी हे गेली काही वर्षे परिषदेशी जोडलेले आहेत.मुंबई शाखेचे पदाधिकारी म्हणूनही ते कार्यरत होते.त्यांच्यावर आता राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.पुढील दोन वर्षे ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील.एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी विशाल परदेशी यांचे अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या.



Post a Comment

0 Comments