Type Here to Get Search Results !

कालकुंद्री येथे नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू.

चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील कालकुंद्री येथील हद्दीत त नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू झाला.सागर गोपाळ (वय ३६,रा.दिंडलकोप,ता.चंदगड सध्या कालकुंद्री) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.शिवाजी पाटील, रा.सरस्वती नगर, कालकुंद्री दिलेल्या वर्दीवरून घटनेची नोंद चंदगड पोलिसात आहे.

या घटनेतील मयत सागर हा वर्दीदार मनोहर पाटील जावई असून तो गेले काही दिवस कालकुंद्री येथे होता. दि.७ रोजी मार्च रोजी मी शिनोळी येथे कामात आहे असे सांगून तू घरात पण गेला होता. पण गेल् दहा दिवस त्याचा काहीच पत्ता लागला नाही. नातेवाईकांकडून त्याचा शोध सुरू होता. तथापि रोजी दुपारी दीड कालकुंद्री व कागणी या दोन नदी दरम्यान नदीपात्रात कुजलेल्या व सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.भारतीय दंड विधान संहिता 2023 चे कलम 1994 नुसार चंदगड पोलिसात नोंद आकस्मिक मयत म्हणून झाली आहे.चंदगडचे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये पुढील तपास सुरू आहे.



Post a Comment

0 Comments