नेसरी प्रतिनिधी : नागरदळे (ता. चंदगड) येथील नाट्यकलाकार सूर्यकांत शंकर गुरव यांनी नुकत्याच झालेल्या र.भा. माडखोलकर चंदगड महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात एकपात्री प्रयोग सादरीकरण करून कार्यक्रमाची उंची वाढवली. त्यांनी राधानगरी वन्यजीव विभागामधे 3 वर्ष वनरक्षक म्हणून् काम केलं.राधानगरी वनक्षेत्रात काम् करताना त्यांनी धडाकेबाज कारवाया देखील केल्या. गुरव यांना मुळात लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने गावी एकच प्याला, वेगळं व्हायचंय मला तसेच लावणीत भडकला अंगार अशा समाजिक व तमाशाप्रधान नाटकात महत्वाची भूमिका बजावली. पुणे येथे खाजगी कंपनीत काम करत ते अभिनयाची आवड जोपासत होते.डिसेंबर 2012 मध्ये झालेल्या पू.ल. देशपांडे महाकरंडक स्पर्धेत त्यांना उत्कृष्ट अभिनयाच पारितोषिक देखील मिळालं. तसेच अभिवाचन, एकांकिका, शॉर्ट फिल्म मध्ये काम करत त्यांनी अभिनयाची छाप पाडली आहे.
2020 साली कोरोना सारख्या महाभयानक संकटात देखील त्यांनी आपल्या पुण्यातील कलाकारासोबत कोरोना जनजागृती विषयी Yes, We Can लघुपटाची निर्मिती केली होती.यामध्ये कोरोना विळख्यात सापडलेल्या तरुणाईने बाहेर कसे पडावे हा महत्वपूर्ण संदेश दिला होता.सध्या ते गगनबावडा येथे नियतक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहे.वनखात्याची नोकरी म्हणजे जंगलाचे काम ते ही आव्हानात्मक.पण त्यातूनही आपली अभिनयाची आवड जोपासून नवीन पिढीला प्रोत्साहित करण्याचे काम ते करत आहेत.
Post a Comment
0 Comments