चंदगड प्रतिनिधी : मजरे कारवे तालुका चंदगड येथील केंद्रीय प्राथमिक शाळेचा इयत्ता पहिलीतील विद्यार्थी कु. शार्दुल संजय साबळे या विद्यार्थ्याने वेद परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला.त्याला मुख्याध्यापक ज्योतिबा पाटील, वर्गशिक्षिका सुजाता कांबळे, अध्यापिका संगीता जळगेकर, नेहा पाटील पालक संजय साबळे संध्या साबळे यांचे मार्गदर्शन लाभले.त्याच्या या यशाबद्दल शालेय समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
Post a Comment
0 Comments