Type Here to Get Search Results !

मराठी भाषा महाराष्ट्राची शान-साहित्यिक शि.तु.गावडे

(महादेवराव वांद्रे बी. एड.कॉलेजतर्फे शिनोळी येथील राजर्षी शाहू विद्यालयात मातृभाषा दिन साजरा)

चंदगड/प्रतिनिधी : हिंदी, इंग्रजी भाषेच्या स्पर्धेत ईतर भाषा मागे पडत आहेत.पण मराठी भाषा महाराष्ट्र राज्याची शान आहे त्यामुळे ती जपने व पुढे घेऊन जाणे हि आपली जबाबदारी आहे.असे प्रतिपादन ग्रामीण साहित्यिक शि.तु. गावडे यांनी केले.ते महादेवराव वांद्रे बी. एड. कॉलेज तुर्केवाडी व राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी यांच्या संयुक्त विध्यमानाने आयोजित मातृभाषा गौरव दिन कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एन. टी. भाटे तर प्रमुख पाहुणे म्हणून हर्षवर्धन कोळसेकर उपस्थित होते. प्रास्ताविक स्मिता पाटील यांनी केले.गावडे पुढे म्हणाले,कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले  आहेत. मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याय येत असल्याचे सांगितले.तर भाषा हि संस्कृतीचे बलस्थान असते त्यामुळे मुलांना मराठी भाषेतूनच शिक्षण द्या तरच मराठी भाषा भविष्यात जपली जाईल यासाठी प्रसार व प्रचार करा असे मत हर्षवर्धन कोळसेकर यांनी व्यक्त केले.यावेळी परशराम नाकाडीसह राजर्षी शाहू विद्यालयाचे शिक्षक तसेच वांद्रे कॉलेजचे प्रशिक्षणार्थी विध्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रियांका हरकारे यांनी केले.आभार तेजस्विनी सावंत यांनी मानले.





Post a Comment

0 Comments