गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर यांच्याकडून तालुक्यातील अनेक दूध संस्थाना भेट.
महाराष्ट्र माझा 24March 24, 20250
चंदगड/प्रतिनिधी : गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर यांच्याकडून चंदगड तालुक्यातील आमरोळी, पोरेवाडी, मुगळी, सोनारवाडी,मलतवाडी,लकीकट्टे, गौळवाडी,बागीलगे,रामपूर, माणगाव अश्या आदी दूधसंस्थाना भेट देण्यात आली.तसेच सदर दुध संस्थेच्या अडचणी जाणून घेतल्या.
संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी भेटीदरम्यान गोकुळ तर्फे दुध उत्पादकांसाठी राबविलेल्या विविध योजनाची माहिती दूधउत्पादकांना दिली व सदर योजनाचा भरपूर प्रमाणात लाभ दूध उत्पादकांनी घेऊन दुध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे असे आवाहनही त्यांनी केले.या संपर्क दौऱ्यावेळी तावरेवाडी चिंलिग सेन्टरचे अनिल शिखरे, सौरभ पाटील,शंकर भुईबर व दुध संस्थेचे पदाधीकारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments