Type Here to Get Search Results !

समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करा - सतिश माळगे

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोरगरीब आणि मागासलेल्या जनतेला न्याय मिळावा त्यांना इतरांप्रमाणेच सोई मिळाव्यात, त्यांना अधिकार मिळावेत म्हणून शासन स्तरावरून सामाजिक न्याय विभागामार्फत कल्याणकारी योजना राबविल्या जातात.त्यासाठी निधी दिला जातो.पण काही ठिकाणी त्याच विभागाचे अधिकारी जनतेच्या निधीवर हात मारून गडगंज होतात.त्यापैकीच जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे(सद्या सहायक आयुक्त रत्नागिरी येथे कार्यरत आहेत)यांनी भरपूर माया जमा केल्याचा आरोप होत आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत अधिकारी पदावर असताना त्यांनी मागासवर्गी्यांच्या निधी मध्ये अपहार केल्याचा चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्राप्त असून घाटे यांना जबाबदार धरण्यात आले आहे.तसेच त्यांच्यावर करावाई व्हावी असा अभिप्राय असूनही अद्यापी ही कारवाई झालेली नाही.

त्यांच्या कारकिर्दीत वसतिगृहसाठी जमीन खरेदी, शिष्यवृत्ती अशा अनेक चौकश्या सुरु असतानाही  संबंधित घाटे यांनी सोलापूर येथे मागासवर्गीय विध्यार्थींच्या शिष्यवृत्ती मध्येही अफरातफर करून बरेच पैसे हडप केले आहेत.त्यांची SIT मार्फत चौकशी झालेली आहे.असे असतांना देखील अश्या बेजबाबदार माणसाला समाजकल्याण खात्याकडून रत्नागिरी येथे सहाय्यक आयुक्तसारखे जबाबदार कार्यकारी पद देण्यात आले.ही बाब आश्चर्यजनक आणी संतापजनक आहे याचा तिव्र निषेध आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतिने करत आहोत.मागासवर्गी्यांच्या निधीचा अपहार केलेच्या कारणावरून त्यांचेवर ऍट्रॉसिटी कायद्यातर्गत गुन्हा नोदवून निलंबित करावे अशी मागणी जनतेतून होत आहे.तसेच याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव सतीश मळगे यांनी माणगाव येथे ऐतिहासिक परिषदमधे सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांना भेट घेऊन कोल्हापूरच्या जनतेला न्याय द्यावा,अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा ईशारा देत, जनतेचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे निवेदनद्वारे सतीश माळगे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments