Type Here to Get Search Results !

वादळी पाऊसामुळे शेतकरी रमेश गावडे यांच्या घराचे नुकसान.

चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यात पडलेल्या वादळी मुसळधार पाऊसामुळे बर्‍याच ठिकाणी शेतकर्‍यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.असाच प्रकार न्हावेली येथे पहायला मिळाला.अचानकपणे पडलेल्या पाऊसामुळे न्हावेली गावातील शेतकरी रमेश सखाराम गावडे यांच्या राहत्या घरी मंगळवार दि.25 मार्च 25 रोजी तीन ते चारच्या सुमारास घराच्या मागच्या बाजूला असणारे सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचे भले मोठे झाड घरावर पडून या शेतकऱ्याचे सुमारे 50 हजाराची नुकसान झाले आहे.त्यामुळे तात्काळ प्रशासनाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करत नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments