चंदगड/प्रतिनिधी : रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण व अध्यक्षा अपर्णा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात रुग्णसेवेचे कार्य सुरु आहे. यासंदर्भात समिती नेते प्रा. आनंद आपटेकर यांनी परिषदेचे उपाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांची गुरुवारी (दि. २०) पुण्यात भेट घेऊन सीमाभागात शाखा स्थापन करण्याबाबत चर्चा केली.
लोकांच्या आरोग्यासाठी ही परिषद खूप मोलाचे कार्य करते आहे.अनेक रुग्णांना या परिषदेच्या माध्यमातून मदत करण्यात आली असून भविष्यात ही अशीच सेवा सुरुच राहणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. बेळगाव सीमाभागातील ८६५ गावातील लोकांना या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे. यासाठी या परिषदेच्या नूतन शाखा सुरु करुन जनसेवा केली जाणार असल्याची माहिती आपटेकर यांनी यावेळी दिली. यावेळी मंदार देसाई, लक्ष्मण शिंदे आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments