Type Here to Get Search Results !

मानव निर्मित वणव्यामुळे अन्न साखळी धोक्यात-वन क्षेत्रपाल प्रशांत आवळे

(किणी येथे पाटणे वन विभाग व सामाजिक वनिकरण मार्फत वनमित्रांचा सत्कार)

चंदगड (प्रतिनिधी) : सह्याद्री पर्वत रांगेत वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. हि वने केवळ वने नसून या विभागाला मिळालेली नैसर्गिक संपत्ती आहे. ती जपणे व जोपासणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.मानव निर्मित वणव्यामुळे अन्न साखळी धोक्यात येते. त्यासाठी जंगल तोड थांबवा व वनांचेसंरक्षण करा. असे प्रतिपादन पाटणे वन विभागाचे वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांनी व्यक्त केले. ते किणी ता.चंदगड येथे वणव्यामध्ये लागलेली आग विझवणाऱ्या नगरदळे येथील चिमुकल्यांसह ग्रामस्थाच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.प्रास्ताविक संजय कुट्रे यांनी केले.

यावेळी सरपंच जिल्हा अध्यक्ष व वन मित्र जी.एम.पाटील म्हणाले वन वनवा निर्मूलन उपक्रमामुळे वनवा पन्नास टाक्यावर आनन्यात यश आले. व वन वाचवण्यासाठी जनजागृती करण्याचे काम या उपक्रमातून होतं आसल्याचे सांगितले. तर सरपंच संदीप बिर्जे म्हणाले वन्य प्राणी, कीटक नसतील तर मानवी जीवन हि परिपूर्ण नाही. वणव्याच्या माध्यमातून केलेले कुरकर्म पुन्हा मानवाच्या वाट्याला येईल असे सांगितले.

यावेळी सामाजिक वनिकरणचे वनपाल टी.बी.भोसले, जॉन्सन डिसोझा, देवेश्वर रावळेवाडकर, के.जी.कांबळे, ग्राम सेविका सुनिता कुंभार, अनंत कांबळे, कल्लाप्पा कुंभार, गुंडू जोशीलकर, लक्ष्मण पाटील, निंगाप्पा माडूळकर, निलेश पाटील, सागर हादगल, महादेव बिर्जे, सूत्रसंचालन विक्रम पाटील यांनी केले. आभार जोतिबा हुंदळेवाडकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments