Type Here to Get Search Results !

चंदगड पोलीस निरीक्षकावर कारवाई करा- ॲड संतोष मळवीकर

चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आशीर्वादाने चालू असलेले चंदगड तालुक्यातील अवैध धंदे बंद करून पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संतोष मळवीकर यांनी गडहिंग्लजचे पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

चंदगड तालुक्यात अवैध धंदे जोरात चालू असून गोवा बनावटीची दारू,मटका तसेच चोरीचे प्रमाण वाढले आहे.पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद करायला गेलेला पीडितांना न्याय मिळत नाही. कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा झाल्याने या गोष्टी संदर्भात पोलीस निरीक्षकांच्याकडे लेखी व तोंडी सूचना देऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.तसेच चंदगड तालुक्यात सुरू असणाऱ्या ह्या अवैध धंद्याची वेळोवेळी आपणालाही माहिती दिली आहे.पण एक वरिष्ठ अधिकारी असून आपल्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही.चंदगड तालुक्यातील अवैध धंदे बंद होऊन पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्यावर कारवाई न झाल्यास आपल्या उपअधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.निवेदन देतेवेळी संतोष मळविकर यांच्यासह भरत गावडे, सुनील नाडगौडा,मारुती दळवी,परशराम मळवीकर,अनिल गावडे, ज्ञानेश्वर माने,काशिनाथ कांबळे उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments