रोहित धुपदाळे/चंदगड शहर प्रतिनिधी : चंदगड शहरात बांधकाम विभागाने लावलेल्या दिशादर्शक बोर्डवरील चिन्हच गायब असल्याने नागरिकात संभ्रमात निर्माण होत आहे.चंदगड हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असुन शहरात तहसिल कार्यालय, पोलिस स्टेशन, न्यायालय, पंचायत समिती, शासकीय बॅंका, शासकीय रुग्णालय, असल्याने परगावाहून येणारी संख्या मोठी असते.काही लोकांना आपल्याला जाण्याच्या ठिकाणी गल्ली अथवा कार्यालय माहिती नसल्याने दिशादर्शक चिन्ह फार महत्त्वाचे ठरते. पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभार पुन्हा एकदा पहावयास मिळाला आहे.
चंदगड शहरातील बर्याच ठिकाणी दिशादर्शक बोर्डवरील चिन्हच गायब केले आहे.अशा या बांधकाम विभागाच्या कारभाराने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे नागरिकातुन संतापाची प्रतिक्रिया उमटत असुन येत्या चार दिवसांत दिशादर्शक चिन्ह लावावे अन्यथा आंदोलन करणार असल्याचे नागरिकांनी महाराष्ट्र माझाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
Post a Comment
0 Comments