प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : हडलगे तालुका गडहिंग्लज येथील सुपुत्र प्रणव नारायण भिकले याची भारतीय सैन्यदलात 109 टी. ए. बटालियन कोल्हापूर बी. आर. ओ.ला निवड झालेने तालुक्यासह भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्याची मैदानी चाचणी जानेवारी 2025 ला झाली.तर लेखी परीक्षा फेब्रुवारी 2025 ला झाली.हा निकाल मार्च 2025 ला लागला.परीक्षेत त्याने घवघवीत यश प्राप्त केले.
यासाठी त्याला काका शहीद जवान स्व.उत्तम भिकले यांची प्रेरणा लाभली.तर वडील नारायण,आई सौ.सुषमा,बहीण प्राजक्ता,आजी सौ.लीला,आजोबा बाळू,काका सुहास -आर्मी,काकी सौ. अरूणा भिकले यांचे प्रोत्साहन लाभले.
Post a Comment
0 Comments