Type Here to Get Search Results !

५ ऑक्टोबरला दि.बलभीम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे उदघाटन


चंदगड : अडकूर येथे स्थापन झालेल्या दि. बलभीम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन रविवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्याहस्ते संपन्न होणार आहे. या सोहळ्याला तालुक्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था चंदगडचे सुजयकुमार येजरे उपस्थित राहणार आहेत. तसेच अभय दादा देसाई, बबनराव देसाई, डॉ. रणजीत देसाई, दयानंद पाटील, यशोदा कांबळे, पुंडलिक इंगवले रामचंद्र दळवी, अजित गोसावी, गोविंद सावंत, सिद्राम पवार, सचिन गुरव, हणमंतराव देसाई, उज्वला देसाई, जगन्नाथ इंगवले, संग्राम देसाई, दादासाहेब  देसाई, संभाजीराव देसाई, रवळू भादवणकर, दीपक गावडे, जयवंत पाटील, प्रवीण गुडवळेकर, केरू शेठ कोले, लक्ष्मण कुराडे, बाळू पारसे , दत्तू वेझंनेकर , रामू गावडे, बाबुराव गुडुळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, महिला व युवकांना पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक आधार व बचतीची नवी दिशा मिळणार असल्याचे अपेक्षित आहे. पतसंस्था ग्रामीण भागात आर्थिक शिस्त रुजविण्यास, स्वावलंबन घडविण्यास व सामूहिक प्रगती साधण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास संस्थेच्या संचालकांनी व्यक्त केला आहे.“हा सोहळा गाव व तालुक्याच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीचा नवा टप्पा ठरेल. त्यामुळे या आनंद सोहळ्याला सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे,” असे आवाहन पतसंस्थेचे मुख्य प्रवर्तक डॉ. टी. ए. कांबळे यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments