Type Here to Get Search Results !

कोवाड महाविद्यालयामार्फत जंगल सफारी मोहीम.

चंदगड/प्रतिनिधी : कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या एन.एस.एस विभागाच्या वतीने पारगड भ्रमंती उपक्रम घेण्यात आला.यामध्ये महाविद्यालयाचे ६५ विद्यार्थी सहभागी झाले होते.जंगल भ्रमणातून वनसंपदा,वन्य प्राणी,पशू पक्षी तसेच ऐतिहासिक लढाई आणि शिवरायांच्या गनिमी काव्यामध्ये जंगलाचे महत्व याविषयी विद्यार्थ्याना माहिती व्हावी यासाठी प्राचार्य एम.एस.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पारगड ट्रॅकिंगचे आयोजन केले होते .

नामखोल ते पारगड असा 10 कि.मी चा अतिशय घनदाट जंगलातून खडतर पायी प्रवास विद्यार्थ्यांनी केला. या जंगल सफारीमध्ये विविध प्रकारचे वन्य प्राणी, पशू - पक्षी त्याचबरोबर विविध प्रकाराच्या वनस्पतींचे निरीक्षण करण्यात आले. वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने पर्यावरण संतुलन बिघडत चालेले आहे.हा एक संदेश विद्यार्थ्यांना द्यायचा होता.जंगल नष्ट होत आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ते आता मानव वस्तीमध्ये येत आहेत त्याची कारणे काय आहेत याचीही प्रचिती सर्वांना झाली पाहिजेत हे या ट्रेकिंग मागचे कारण होते.     

यावेळी एन एस एस विभाग प्रमुख प्रा.दीपक पाटील यांनी जैविक संपदा,वन्यप्राणी च्या पाऊल खुणा प्राण्याच्या विष्टेवरून प्राण्याची ओळख पाणवटे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.सुमारे 4 तास प्रवास करत जय शिवाजी महाराज ,संभाजी महाराज,जयशिवाजी जय जिजाऊ यांचा जय घोष करत विद्यार्थी परगडावर पोहचले.पारगडवर  विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या सभोवतालची  स्वच्छता केली.तसेच ज्येष्ठ इतिहास संवशोधक प्रा. डॉ.नंदकुमार गावडे यांनीही या मोहिमेमध्ये भाग घेऊन त्यांनी या ऐतिहासिक पारगड किल्ल्याचे महत्त्व विविध संदर्भाचे दाखले देत विद्यार्थ्यांना सांगितले.या मोहिमेत डॉ व्ही. के.दळवी,डॉ. मोहन घोळसे,प्रा. संदीप पाटी,प्रा.संदीप मुंगारे,प्रा. महादेव गावडे,प्रा.चेतन कणसे सामील झाले होते.

Post a Comment

0 Comments