Type Here to Get Search Results !

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची आमदार शिवाजीराव पाटील यांनी घेतली भेट.

चंदगड/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची आमदार शिवाजीराव पाटील यांनी भेट घेतली.व तालुक्यातील वाहतुक व्यवस्था जलदपणे सुरळीतपणे व्हावी याकरिता चंदगड विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित रस्ते व पुलांच्या कामासंदर्भात चर्चा केली.मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या कामांना अधिक गती मिळावी यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना विनंती केली.यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

आमदार शिवाजीराव पाटील ऐक्टिव मोडमधे दिसत असून त्यांनी अधिवेशनामध्ये मांडलेले बेरोजगारी व विकासा संदर्भातील मुद्दे सरकारच्या लक्षात आणून देत त्याविषयी तात्काळ कार्यवाही व्हावी व तालुक्याच्या विकासाला गती मिळावी यासाठी हे मुद्दे आपल्या भाषणातून लावून धरले.त्यामुळे आमदार शिवाजीराव पाटील यांचे चंदगडवाशीयातून कौतुक होत आहे.


Post a Comment

0 Comments