Type Here to Get Search Results !

दोडामार्गातून बेळगाव-चंदगड बस सुरू करा.

चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : तिलारी घाटातील भिंत खचल्याने पुढील धोका ओळखून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी एसटीसह अवजड वाहतूक बंद केली होती.घाटातील भिंतीचे काम पूर्ण झाल्याने एसटी वाहतूक करण्यास कोणतीच अडचण असणार नाही अशा आशयाचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे इफ्तीकार मुल्ला यांनी राज्य परिवहन मंडळ कोल्हापूर यांना कळविल्याने लवकरच एसटी वाहतूक सुरु होईल.      

तिलारी घाट रस्ता हा गोव्याला जाण्यासाठी  जवळचा असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. तिलारी नगर, भेडशी दोडामार्ग इत्यादी गावातील लोकांची शिक्षण, आरोग्य व इतर कामासाठी  बेळगाव व कोल्हापूरला नेहमीच ये-जा असते. मात्र वाहतुकीसाठी हा रस्ता भिंत खचल्याने बंद होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रयत्न करून भिंतीचे काम पूर्ण केले असून वाहतुकीसाठी हा मार्ग मोकळा झाला आहे. घाट रस्ता बंद झाल्याने लोकांची गैरसोय टाळण्यासाठी आमदार शिवाजी पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होतात्यामुळे बांधकाम विभागाने हे काम अग्रक्रमाने पूर्ण केले.दोडामार्गातून बेळगाव चंदगड बस सुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे शिवाजी पाटील यांनी केले आहे. यावेळी भाजपाचे लक्ष्मण गावडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश गवस,जेष्ठ पत्रकार विजयकुमार दळवी,अंकुश गावडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments