चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : गडहिंग्लज येथील सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. शोभा कोकितकर यांना साऊथ वेस्टर्ण अमेरिकन युनिव्हर्सिटी कडून डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.डॉ. शोभीता यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.डॉ.शोभीता या 2006 पासून कोल्हापूर,गडहिंग्लज,आजरा, चंदगड आणि सीमाभागात विविध प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये अतिशय मोलाची कामगिरी करून आपला एक वेगळा ठसा उमटवीला आहे.
कार्य-
शोभीता कोकितकर यांनी सुरुवातीला स्वयंसेवक म्हणून काम केले.त्यानंतर मेडिकल विभाग,अंधश्रद्धा निर्मूलन,अध्यात्मिक व एच.आय.व्ही तसेच टी.बी.च्या लोकांसाठी काम केले.हजारो लोकांना जीवन जगण्याची नवी उमेद व नवी दिशा दिली.या इतर सामाजिक कामापेक्षा एक वेगळे काहीतरी करायचे म्हणून त्यांनी सेक्श्युअल रिप्रोडक्टिव हेल्थ राईट विशेष गट (SRHR) यासाठी समुपदेशक म्हणून काम केले. हे काम खूपच आव्हानात्मक होते.हे काम करत असताना त्यांनी स्वतःला या कार्यात अगदी झोकुन देऊन काम केलं आणि एक वेगळी ओळख उत्तम समुपदेशक म्हणून निर्माण केली.याचबरोबर गरजू लोकांना संजय गांधी योजना,बालसंगोपन योजना श्रावण बाळ योजना,गरजू मुलांच्या शाळेसाठी मदत एच. आय. व्ही.बाधित मुलांसाठी फराळ आणि कपडे वाटप,एचआयव्ही बाधित मुलां-मुलींची लग्न जमवणे, विधवा व अनाथ मुली यांना त्यांच्या अधिकार मिळवून देणे,बस पास फ्री मिळावा त्यासाठी त्यांनी व त्यांच्या टीमने प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नातून सध्या एचआयव्ही पेशंटला हॉस्पिटलला येण्या-जाण्यासाठी बस पास मिळत आहे. सध्या त्या नीड बेस मेडिकल कॅम्प आयोजन करणे, ब्लड टेस्टिंग व ब्लड डोनेट कॅम्प, भ्रष्टाचार विरोधी मानवाधिकार, कॅन्सर मुक्त महिला अभियान, समाजातील उत्तम आणि विशेष कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान व पुरस्कार देऊन गौरव करणे अश्या अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या हातून चालू आहेत. सध्या त्यांच्या कार्यात जर आपणाला सहभाग घ्यायचा असेल किंवा कोणत्याही प्रकारची मदत करायची असेल तर त्यांच्या व्हाट्सअप क्रमांक 8308792619 संपर्क साधू शकता असे ' महाराष्ट्र माझा 24' शी बोलताना त्यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments