Type Here to Get Search Results !

मराठा समाजातर्फे कै.अण्णासाहेब पाटील यांची पुण्यतिथी साजरी.

चंदगड/प्रतिनिधी : कामगार नेते कै.अण्णासाहेब पाटील यांची 43 वी.पुण्यतिथी चंदगड येथे मराठा समाजातर्फे साजरी करण्यात आली.श्री.देव रवळनाथ मंदिर सभागृहामध्ये ही पुण्यतिथी मराठा रणरागिनी तर्फे साजरी करण्यात आली.1982 साली कै.अण्णासाहेब पाटलांनी आपल्या मराठा समाजाच्या मागण्यासाठी विधानभवनावर मोर्चा नेला होता.आणि आपल्या शंभर टक्के मागण्या पूर्ण होणारच असे मराठा समाजाला आश्वासन दिले होते.मात्र मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे अण्णासाहेब पाटलांनी आपल्या कुटुंबाचा विचार न करता स्वतःवर गोळ्या झाडून मराठा समाजासाठी आपल्या प्राणाची आहूती दिली होती.यांचे स्मरण मराठा समाजाला राहावे म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघ चंदगड तालुका रणरागिनी तर्फे या  कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून मराठा समाजाचे अध्यक्ष सुरेश सातवेकर यांनी अण्णासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले.मराठा महासंघाचे तालुका सरचिटणीस राजाराम सुकये यांनी स्वर्गीय अण्णा साहेब पाटील यांचा जीवनपट सांगितला.

मराठा महासंघ महिला विभागाच्या चंदगड तालुका अध्यक्ष पूजा शिंदे यांनी चंदगड शहर महिला कार्यकारणी स्थापन केल्याचे सांगितले तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला.यावेळी प्राध्यापक गुरबे, प्राध्यापक सी.एस देसाई,डॉ.राजाराम गावडे,महादेवराव वांद्रे ,स्वाती गावडे,अंकिता गावडे यांनी आपापली मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता सावंत यांनी केले.यावेळी तालुका सरचिटणीस राजनंदिनी पाटील,अश्विनी मुतकेकर यांनी महिलांना उद्देशून आपली मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुनम कडुकर यांनी केले.या कार्यक्रमाला कोवाड विभागातून मराठा उपाध्यक्ष रुपाली वांद्रे,माणगाव विभागातून रेखा देवन,शिरगाव नागनवाडी विभागातून मंगल वाके तसेच तुडये विभागातून आशा अप्पाजी गावडे व तालुका युवती उपाध्यक्ष कुमारी पूजा इंगवले उपस्थित होत्या.तर राजाराम सुकये यांनी आभार मानले.



Post a Comment

0 Comments