चंदगड/प्रतिनिधी : धर्मवीर छत्रपती श्री.संभाजी महाराज बलिदान मास निमित्ताने आज श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने शिवशक्ती स्थळ येथे रक्तदान शिबीर पार पडले.यामधे भागातील शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.तर 57 पिशवी रक्त संकलन करण्यात आले.यावेळी आयोजकांकडून शिवभक्तांचे व वैभव लक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी शिवप्रतिष्ठान अनिकेत घाटगे,अनिकेत सावंत,तेजस गावडे,मनोज हळदणकर,सौ.दळवी,सौ.उंबरेताई,गणेश मुळीक,रमेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments