Type Here to Get Search Results !

ग्रामविकास हाच माझा ध्यास-माजी आमदार राजेश पाटील

(चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुधार योजनेचा शुभा

चंदगड/प्रतिनिधी : ग्रामविकास हाच माझा ध्यास असून गाव अंतर्गत रस्ते, पाणी, गटारे, शिक्षण, आरोग्य • व इतर सुविधा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन माजी आमदार राजेश पाटील यांनी केले.हलकर्णी येथे डॉ. बाबासाहेब - आंबेडकर सुधार योजनेंतर्गत साकव बांधकामासाठी ६० - लाखाचा निधी मंजूर होता.याच्या शुभारंभावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सरपंच राहुल गावडा होते.

राजेश पाटील पुढे म्हणाले, या गावचे नेते भरमाण्णा गावडा यांनी नेहमीच आम्हाला या परिसरातील गावांच्या विकासाकरता पाठबळ दिले आहे. अनेक कामांसाठी आमच्याकडे पूर्तता केली आहे. टप्याटप्याने ती कामे आम्ही पार पाडत आहोत.भरमाण्णा गावडा यांनी राजेश पाटील यांचे स्वागत केले. त्यावेळी गावडा यांनी विविध विकासकामांकरिता निधी दिल्याबद्दल पाटील यांचे आभार मानले.

या पुलामुळे अनेक गावाचा संपर्क जोडला जाणारा असून शेती पुरक व्यवसायाला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना वाहतुकीला हा पुल एक वरदान ठरणार असून आपण नेहमीच पाटील यांच्या पाठीशी राहणार आहोत, अशी हमी दिली. यावेळी सुतार, तानाजी गडकरी, पांडुरंग बेनके, विठ्ठल पावले, विश्वनाथ पाटील, विठोबा गावडे, मारुती नाकाडी आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments