Type Here to Get Search Results !

चंदगड येथील राम मंदिर मध्ये समरसता कुंभ संपन्न !

चंदगड/प्रतिनिधी : अनुगामी लोकराज्य महाभियान अर्थात अनुलोम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समरसता कुंभ नावाची मोहीम सुरू करण्यात आली आहे.आपल्या सर्वांच्या धावपळीच्या युगात १४४ वर्षांनी आलेल्या महाकुंभाला प्रत्येकालाच जाणं शक्य नाही, याचा विचार करून अनुलोम सामाजिक संस्थेने प्रयागराज येथिल तीर्थकलश पूजनासाठी चंदगडमध्ये आणला आहे. अनुलोम संस्थेचे चंदगड विधानसभा प्रमुख अमेय विलास सबनीस यांनी सदर सोहळ्याचे आयोजन राम मंदिर चंदगड येथे केले होते. 

प्रयागराज येथे हिंदू धर्मातील सर्व जातीतील लोकांनी जाऊन स्नान केले, हिंदू एकतेचे दर्शन संपूर्ण जगाला या माध्यमातून घडले. याच धरतीवर हिंदू समाजातील सर्व प्रगतशील समाजातील 21 जोडप्यांच्या माध्यमातून कलशाचे पूजन करण्यात आले. अमेय सबनीस यांनी प्रयागराज येथील महाकुंभा बद्दल माहिती दिली. उत्तरप्रदेश व भारत सरकारचे आभार देखिल मानले. दिपक वड्डेर, विजय गुरव यांनी अनुभव कथन केले.अनुलोम वस्तिमित्र , स्थान मित्र , प्रभावशाली व्यक्ती, प्रगतशील समाजातील सर्वजण उपस्थित होते.कलशाचे पूजन झाल्यानंतर आरती करून प्रसाद वाटप झाले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



Post a Comment

0 Comments