चंदगड/प्रतिनिधी : राज्य शासनाकडून पंचायत राज समिती व धर्मादाय खाजगी रुग्णालय तपासणी समिती चंदगड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील यांचा समावेश केला असून त्याचा लाभ मतदारसंघातील लोकांना होणार आहे.पंचायतराज समिती प्रमुख आमदार संतोष दानवे यांच्यासह आमदार सुरेश धस गोपीचंद पडळकर दीपक केसरकर यांच्यासह वीस जणांच्या समितीत आमदार शिवाजीराव पाटील यांचा समावेश आहे.
आमदार शिवाजी पाटील यांचे आरोग्य विषयक काम ही उत्कृष्ट असून त्याची दखल राज्य शासनाने घेऊन धर्मादायक खाजगी रुग्णालय तपासणी समितीतही विधी व न्याय राज्यमंत्री ऍड आशिष जसवाल यांच्या नेतृत्वाखाली समितीची आमदार शिवाजी पाटील यांच्या नावाला पसंती दिली आहे.त्यांच्यासोबत आमदार नमिता मुदंडा राहुल आवाडे मिहीर कोटेचा प्रकाश सुर्वे यांच्यासह निवडक लोकप्रतिनिधींचा समावेश आहे.राज्य शासनाच्या वरिष्ठ समितीवर आमदार शिवाजी पाटील यांची वर्णी लागल्याने याचा फायदा चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेला होणार आहे.
Post a Comment
0 Comments