Type Here to Get Search Results !

कोवाड-बेळगांव मार्गांवर ट्रक व दुचाकी अपघातात एकजण जखमी.

चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : कोवाड-बेळगांव मार्गांवरील होसूर नाल्याजवळ अज्ञात ट्रक  व दुचाकी यांच्यात धडक होऊन दुचाकीचे दोन तुकडे झाले.या अपघातामध्ये चालक जखमी असून दुचाकी वरील पाठीमागील प्रवासी आश्चर्यकारक रित्या बचावला. 

याबाबत अधिक माहिती अशी किशन मारुती साळुंखे  राहणार शिवणगे ( ता. चंदगड )  बेळगाव येथे कामाला असून आपले काम संपवून तो कोवाड मार्गे आपल्या गावी जात असताना गुरुवारी संध्याकाळी अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीचे दोन तुकडे झाले असून समोरचे चाक व हँडल वेगळे तर व दुचाकीचा उर्वरित भाग वेगळा असा झाला होता.अपघातानंतर अज्ञात ट्रकचालक पसार झाला. रात्री उशिरा पोलिसात घटनेची नोंद करण्यासाठी हालचाली सुरू होत्या.

Post a Comment

0 Comments