नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : राजगोळी बुद्रुक ता.चंदगड येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक,माजी सरपंच नारायण जोतिबा पाटील वय 81 वर्षे यांचे अल्पशा आजाराने सोमवार दिनांक 24 मार्च 2025 रोजी सायं.5 वा.50 मिनिटांनी निधन झाले.त्यांचा अल्प परिचय थोडक्यात,माजी सरपंच स्व.नारायण पाटील यांचा स्वभाव साधा,मनमिळावू व प्रेमळ असा होता.त्यांचे शिक्षण जुनी बारावी पर्यंत झाले होते.लहानापासन थोरांपर्यंत सर्वजण त्यांना माजी सरपंच म्हणून आदराने हाक मारत असत.पंधरा वर्षे सरपंच पदाच्या काळात त्यांनी गावात अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या.शिवराज शिक्षण संस्थेसाठी पण त्यांनी संचालक पदाची उत्कृष्टपणे जबाबदारी सांभाळली.त्यांना वर्तमानपत्र वाचन करण्याची व भजनाची तसेच शेतीची आवड होती.त्यांच्या अचानक जाण्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दि.2 एप्रिल रोजी तर दिवस कार्य गुरुवार दि.3 एप्रिल 2025 रोजी होणार आहे.
ऋण निर्देश -
आमचे वडील माजी सरपंच स्व.नारायण जोतिबा पाटील वय 81 वर्षे यांचे सोमवार दि.24 मार्च रोजी निधन झाले.या दुःखद प्रसंगी सर्व ग्रामस्थ,नातेवाईक,मित्र परिवार, शैक्षनिक,सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर ,सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य , ब्रम्हलिंग विकास संस्था व शिवराज शिक्षण संस्था यांचे पदाधिकारी व सर्व सदस्य,यांनी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून आमच्या कुटुंबाचा दुःखभार हलका करण्याचा प्रयत्न केला.या सर्वांचे आमचा परिवार ऋणी आहे.
शोकाकुल परिवार -
पत्नी - श्रीमती नर्मदा नारायण पाटील माजी ग्रा. पं. सदस्य व संचालिका - ब्रम्हलींग विकास संस्था,मुले - दत्तात्रय पाटील उपतालुका प्रमुख शिवसेना,माजी व्हा.चेअरमन बरम्हलिंग विकास संस्था राजगोळी बुद्रुक,सदस्य - संजय गांधी निराधार योजना चंदगड, जोतिबा पाटील,सुना - सौ.मनीषा,सौ.ज्योती, मुली - सौ.कांचन मारुती जाधव हलकर्णी ता.चंदगड,सौ.वनिता जोतिबा गवी काकती बेळगाव,सौ.सुनीता कृष्णा मेलगे गोजगा सध्या रा.मुंबई असा परिवार आहे.
महाराष्ट्र माझा 24 कडून भावपूर्ण श्रद्धांजली !
Post a Comment
0 Comments