चंदगड/प्रतिनिधी : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे शुभम शेळके यांनी कर्नाटक प्रशासनाने हद्दपारची नोटीस बजावली असून कर्नाटक सरकारच्या दडपशाही विरोधात महाराष्ट्र सरकारने आवाज उठवावा यासाठी युवा समिती सिमाभाग यांच्यावतीने चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील तसेच माजी मंत्री भरमुअण्णा पाटील यांची भेट घेण्यात आली.यावेळी बेळगांवमध्ये मराठी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल नाराजी व्यक्त करत आपण लक्ष घालावे ही विनंती केली.तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर लक्ष घालावे यासाठी पुढाकार घेवून मध्यस्ती करण्याची विनंती शिवाजीराव पाटील यांना करण्यात आली.
यावेळी सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष प्रविण रेडेकर, उपाध्यक्ष नारायण मुंचडीकर, विजय जाधव, चंद्रकांत पाटील, रामनाथ मुंचडीकर, सुयोग कडेमनी आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments